श्री. पु. भागवत : व्यापक सामाजिक-सांस्कृतिक भान असलेले, वाङ्मयासह सर्व कलांवर प्रेम करणारे संपादक, प्रकाशक आणि वाङ्मयचिंतक
श्री. पु. भागवत अपूर्ण, अर्ध्यामुध्या साहित्यकृतीला परिपूर्ण बनवणारे संपादन करत. समोर आलेल्या लक्षणीय साहित्यकृतीला कलासंपन्न बनवू शकणारे, पण तिच्यात सुप्तपणे दडलेले घटक श्री. पुं. ना चटकन जाणवत. अशी अभिरुची, असे साहित्यकृतीच्या स्वरूपाचे अंतर्ज्ञान श्री. पु. भागवतांच्या आधी कुठल्याही संपादकाला प्राप्त झाले नव्हते. या अर्थाने ते एकमेव संपादक होते.......